top of page
Search

Focus कमी? शिकण्याची Style बदलण्याची वेळ आलीये!


आजकाल लोकांचं लक्ष खूप लवकर हटतं.(People lose focus quickly.) तुम्ही पण अनुभवले असेल — एखादं पुस्तक वाचायला घेतलं आणि ५ मिनिटांनी मोबाईल हातात!किंवा एखादं व्हिडिओ लावलं, पण मध्येच स्क्रोल करून दुसरंच काही पाहायला सुरुवात केली.

ree

📉 आजची समस्या – कमी झालेला फोकस

सध्या माणसाचं average attention span आहे फक्त ८ सेकंद!

यामुळेच लांबचं वाचणं, अभ्यास करणं, काही नविन शिकणं खूपच अवघड वाटतं.

✅ उपाय – मायक्रो लर्निंग

(Micro Learning = छोटे छोटे तुकड्यांमध्ये शिकणं)


काय म्हणायचं आहे त्याचं सोपं उदाहरण बघा:

Example 1:

मोठं पुस्तक: "Personality Development – 250 pages"👉 तुम्ही वाचायला सुरुवात करता, पण कंटाळा येतो, वेळ लागत नाही, पूर्ण होत नाही.

Micro Learning Version:"Personality Tip of the Day – 1 Page, 5 Tips, 5 Minutes"👉 रोज फक्त एक छोटा भाग, आणि लगेच वापरता येईल असा!


🎯 फायदे काय आहेत?

  1. Time लागणार नाही– फक्त ५-१० मिनिटांत एका विषयाचं सार!

  2. मनात पक्कं बसतं– छोट्या भागातली माहिती लक्षात राहते.

  3. लवकर results मिळतात– लगेच अंमलात आणता येईल असं शिकणं.

  4. Mobile वर सहज करता येतं– वाटेत, ब्रेकमध्ये, रात्री झोपण्याआधी.

  5. Interest टिकतो– कारण दररोज काहीतरी नविन आणि छोटंसं.


🧘‍♂️ अजून एक उदाहरण – "मन शांत ठेवायचंय?"

एक मोठं meditation पुस्तक वाचायचा विचार करा – 300 pages.अर्ध्यातच थांबता.

पण जर दररोज एक छोटी meditation technique, एक सकारात्मक affirmation, किंवा एक विचार मिळाला — तर?


5 मिनिटांत, मन शांत + नवीन शिकवण मिळाली.

🔚 निष्कर्ष (Conclusion):

आज कमी वेळ लक्ष राहिलं तरी शिकणं थांबायचं नाही.थोडं-थोडं पण दररोज शिका. Micro learning मुळे मोठं शिकणं सहज शक्य आहे.

एकच मंत्र लक्षात ठेवा:

"मोठं शिकायचंय? मग छोटं-छोटं करून शिक!"

📌 तुमचा अनुभव शेअर करा – तुम्ही शेवटचं मोठं पुस्तक पूर्ण कधी वाचलं?

 
 
 

Comments


bottom of page